पंचकर्म
पंचकर्म ही शोधन स्वरूपाची चिकित्सा पध्दती असून हयाच्या द्वारे प्रकोपित झालेले वातादि दोषांना शरीरा बाहेर काढून शरीर शौधनाचे कार्य केले जाते, ते पाच प्रकारे होते म्हणून त्यांना पंचकर्म म्हणतात,ही पंचकर्म
१) वमन
२) विरेचन
३) बस्ति – निरूह ,अनुवासन
४) रक्तमोक्षण
५) नस्य ही प्रधान कर्म आहेत
प्रधान कर्मापूर्वी करावयाचे कर्म - शोधन क्रिया करतांना दोष सहज विना आयास शरीराला कोणताही त्रास न देता बाहेर पडण्यासाठी ह्या कर्मांचा उपयोग होतो ही
१) पाचन
२) स्नेहन
३) स्वेदन होत.
ही शोधना पूर्वी करावयाची असतात म्हणून त्यांना पूर्वकार्म म्हणतात. आणि प्रधान कर्मा नंतर
१) संसर्जंन क्रम
२) रसायनादि क्रम
३) शमन प्रयोग केली जातात व त्यांना पश्यात कर्म म्हणतात.
हयाशिवास शिरोधारा ,शिरोबस्ति, हर्र्दबस्ति .वृक्कबस्ति,नेत्रपुरण तर्पन पुटपाक आश्चोतन ,कर्ण पुरण गंडूष कावल लेप प्रसेक,उपनाह धुम्रपान आदि उपक्रम ही पंचकर्मात समाविष्ट होतात,
ह्या सर्व उपक्रमांचा सविस्तर विवेचन व अनुभवी वैद्य मंडळीचे मार्गदर्शन विवेवन ही असणार आहे.
दोषा :कदाचित्कुप्यंति जिता लंघन पाचनै:|
जिता संशोधनैर्यषु न तेषां पुनरूध्दभव:||
snaohna