आहार संकल्पना

आयुर्वेदिय आहार संकल्पना


‘प्राणिनां पुर्नमूलमाहारो बलवर्णीजसां च ‘ सर्व प्राणीमात्रांचे बल वर्ण ओज आदिंचे मूळ कारण जे आहार द्रव्य असून आपण जे सेवन करतो ते आपल्या शरीर घटकांना पोषक, समतोल ठेवणारे, मन व इंद्रियांना तृप्त करणारे, स्वास्थ्य विरोधी नसणारे आणि आपली प्रकृति , वय, बल, काल, ऋतु, व्यवसाय , देश आदि गोष्टीना अनुकुल – योग्य व विधीयुक्त सेवन, असा आहार असावा ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार आपण आहार संकल्पनेत करणार आहोत.

मात्रा
मनुष्याने योग्य प्रमाणात, योग्य मात्रेत भोजन करावे. ही आहार मात्रा आपल्या पाचकाग्निवर अवलंबून असते.-‘अग्निबलोपक्षिणी’ ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते प्रत्येकाच्या पचन शक्तिवर अवलंबून असते
योग्य मात्रेत आहार सेवन केले असता घेतलेल्या आहारामुळे कुक्षीवर दाब न पडणे, ह्दय गति अवरूध न होणे ,पार्श्र्वभागी फाटल्याप्रमाणे वेदना न होणे, उदर गौरव नसणे , इंद्रियांची प्रसन्नता असणे, क्षुधा व तृष्णा शांत होणे, उभे राहणे,बसणे,झोपणे,चालणे,श्वास-प्रवास , हासणे बोलणे, या सर्व क्रियामध्ये सूखानुवृत्ति (सुखाचे अनुभव होणे), उचित काळात कोणताही त्रास , कष्ट न होता , सहज पचन होणे. सकाळी खाले असता संध्याकाळ पर्यंत त्या अन्नाचे जीर्ण होणे व संध्या- रात्री खालेल्या अन्नाचे सकाळ पर्यंत जीर्ण होणे व योग्य परीपाका होऊन त्या आहारारसाने शरीराचे बल वर्ण व वृध्दी होणे. ‘बलवर्णीपचयकरत्वं ‘ ती त्या व्यक्तीची सम्यक आहार मात्रा होय.
हीन मात्रेत घेतलेल्या आहारामुळे बल वर्ण शरीरावयक वृध्दि या सर्वांचा नाश होतो. ही मात्रा तृप्तीकारका असते. ह्या हीन मात्रेमुळे उदावर्त , आयुष्याचा नाश करणारी , वीर्य नाशक ओजक्षय करणारी, शरीर -इंद्रिय मन व बुध्दि यांना हानी पोहचविणारी त्वकरक्तादि सारतेचा नाश, शरीर तेजोहीन , शरीर हे वात विकाराचे घर होर्इल अशी स्थिती होणे.
अति मात्रेत खाले असता सर्व दोष प्रकोपक असतो. जी व्यक्ती मूर्त आहारसमूहांनी तृप्ती मिळाल्यावर पुन्हा द्रव पदार्थांनी तृप्ती करते, त्यात आमाशय गत वात, पित्त, कफ हे अत्यधिक पीडित होऊन एकदम प्रकोपित होतात. हे प्रकोपित दोष त्या अपाचित आहाररसात मिसळून अवष्टंभ निर्माण करतात. किंवा ऊर्ध्व वा अधो मार्गाने प्रवृत्त होऊन विविध प्रकारचे रोग निर्माण करतात. अतिमात्रेत आहार घेणा-या व्यक्तींना वातदोषामूळे – शूल ,आनाह,अंगमर्द,मुखशोथ,मूर्च्छा भ्रम,अग्निवैषम्य, पार्श्वकटीपृष्ठग्रह , सिरासंकोच तथा ग्रह, हीलक्षणे उत्पन्न होतात.
पित्तदोषामूळे ज्वर, अतिसार, अंगदाह, तृष्णा, मद, भ्रम व प्रलाप
कफदोषामूळे छर्दि, अरोचक, अजीर्ण , शीतज्वर, आलस्य आणि गौरव ही लक्षणे उत्पन्न होतात.
कुक्षी (जठर) आहार सेवन करतांना कुक्षी व आहाराचे दृष्टीने तीन विभाग करावेत. एक भाग घन आहार, दुसरा द्रव पदार्थांसाठी आणि तिसरा वातपित्तकफाच्या संचरणासाठी रिक्त ठेवावा त्यामूळे अमात्राजनित विकार होत नाहीत. वाग्भटाने उदराचे चार भाग कल्पून दोन भाग घन आहारासाठी, एक भाग द्रवासाठी व चौथा वातादि दोषांसाठी ठेवावा.
आधुनिक आहार शास्त्राच्या दृष्टीने आहार मात्रा ही कॅलरी (उष्मांक) नुसार ठरविली जाते. सर्व साधारण पणे सामान्य व्यक्तीस
मनुष्यास २५००ते२६०० कॅलरीज ची व स्त्रीयांना २१०० तर
१० ते१२ वर्षाच्या मूलास २१०० व मूलीना १८०० कॅलरीजची आवश्कता असते.
ती ७० टक्के कार्बोहाड्रेटस, १५ते २० टक्के, प्रोटीन्स व १० ते१५ टक्के फॅट पदार्थांमधुन मिळते.
श्रमाचे कष्टांचे काम करणार्र्यांना अधिका आहाराची गरज असते तर बैठे काम करणार्र्यांना कमी कॅलरी असलेल्या आहाराची आवश्यकता असते, खेळणार्र्या व वाढत्या वयोगटातील मूलांनाही प्रोटीन्स अधिक असलेल्या आहाराची आवश्यकता असते तर गर्भीणी व स्नपान करणार्र्या स्त्रीयांनाही अधिक आहाराची गरज असते,
आहार द्रव्यांत कार्बो प्रोटीन्स फोट आदि घटक द्रव्य किती आहे व त्यापासून किती एनर्जी कॅलरजीस प्राप्त होतात ह्याचे विश्लेशन आधुनिक असून त्याप्रमाणे त्यांची आहार योजना असते. परंतु आपण सेवन केलेला आहाराचे पचन हे आपल्या पाचकाग्निवर अवलंबून असून तो प्रत्येकाचा भिन्न असू शकतो तो व्यक्तीसापेक्ष असल्याने प्रत्येकाने आपली पचन शक्ती किती आहे हे स्वत: निश्चित करावयास हवे.
योग्य मात्रेत घेतलेल्या आहारानंतर आम निर्माण झाल्याचे दिसून येते त्यास गुरू, रूक्ष, शीत, शुष्क, द्विष्ट – तिरस्कार वाटतो असा, विष्टंभी, अपवित्र तथा विरूध्द अन्नपानाचे सेवन याबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, इर्षा, लज्जा, शोक, अभिमान उदृवेग, किंवा भय यांनी मन दु:खी झाले असता योग्य मात्रेत हितकर आहार सेवन केले असतांनाही आमदोष उत्पन्न होतो.
चिंता, शोक, भय, क्रोध, दु:खशय्या व रात्री जागरण या कारणांनी उचित मात्रेत घेतलेल्या पथ्यकर आहारही योग्य प्रकारची पचत नाही. व या आमदोषामूळे विसूचिका व अलसक हे विकार होतात.

द्रव्याची प्रकृती, कारण, संस्कार
काही पदार्थ स्वाभावताच पचनास जड (गुरू) किंवा हलकी (लघु) असतात तो त्यांचा स्वभाव असतो जसे उडदि हे गुरू तर मूग लघु हे द्रव्याच्या गुरर्वादि गुणावर अवलंबून असते. ते त्या द्रव्याच्या ठिकाणी स्वभावताच असतात त्यास त्या द्रव्याची प्रकृति म्हणतात.
स्वाभाविक गुणयुक्त द्रव्यावर जे संस्कार केले जातात त्यास करण असे म्हणतात. संस्कार म्हणजे गुणान्तराधान. वेगळे गुण उत्पन्न करणे होय.
या गुणांचे आधान जल, अग्निसन्निकर्ष, शोधन, मन्थन, देश, काल, वासन भावना आदि द्वारा किंवा काल, प्रकर्ष किंवा प्रात्र विशेष याद्वारे होते संस्कार हे अनेकप्रकारे केले जातात.
१) जलामुळे रूक्ष गुण प्रधान द्रव्यांत मृदुता आदि गुणांचे आधान होते
२) अग्नि संस्कारामूळे भात स्वभावताच गुरू असते पण शिजवल्यामूळे त्यास लघु येते. भाजुन लाह्या कोल्या असता. त्या अधिक लघु होतात तर सुकामेवा टाकून दुधात शिजवलेला भात (खीर) पोष्टीक होते परंतु गुरू गुणाची होते.
३) शौच शोधन विष द्रव्यांचे शोधन करून औषधा साठी वापरणे. गोमूत्रात बचनागाचे शोधन.
४) मंथन अभिष्यंदि शोथकार दही घुसळून ताक केले असता ते पातळ ताक शोथहर होते.
५) देश देशानुरूप प्राण्यांच्या मांसाचे गुणधर्म बदलताना दिसतात.
६) काल भस्म वा आसवारिष्ट बनविताना विशिष्ट काळानंतर गुणातराधान घडतांना दिसते.
७) वासना काही काळ जाऊ देणे. नविन धान्य (भात) कफा वर्धक असून जुना झाल्या नंतर खावा.
८) भावना द्रवरसाबरोबर एखादे चूर्ण घोटणे ह्याने त्याने त्या द्रव्यातील कार्यकारी शक्ति वाढते.
९) भाजनपात्र तांब्याच्या भांड्यात ठेवलेले तुप विषारी बनते. तर तांब्याच्या भांडयातील पानी पिण्यास हितकर होते

संयोग
दोन किंवा दोना पेक्षा अधिक द्रव्यांच्या परस्पर मीलनास संयोग म्हणतात. स्वतंत्र द्रव्य जे कार्य करू शकत नाही ते कार्य हा विशेष समुह करू शकतो. उदा. मध व घी समप्रमाणात विषवत होते तसेच , मासे +दुध, दूधाबरोबर आम्ल, लवण रसात्मक द्रव्यांचे सेवन हे शरीरास अहितकारक ठरतात. व यातील कोणत्याही द्रव्यात काष्ठु जनकत्व गुण नसतांना केवळ संयोगा मूळे कुष्ठ जनकत्व येते , हे सर्व विकृति विषम समवायाने घडते.

शरीरस्थ धातुच्या गुणांशी विपरीत गुण असणारी द्रव्ये ही देहधातूच्या विरोधी असतात व त्यास विरूध्द आहार (विहारही) म्हणतात. अष्टांग संग्रह.चरक.वाग्यभट.सुश्रुत आदि सर्व ग्रंथात आहाराचे विस्तृत वर्णन असून हे एकआयुर्वेदिय विचारांचे वैशिष्ट म्हणता येर्इल.

  1. पारंपारिक विषमता विरोध दुध आणि कुलत्थ या मध्ये दूध हे मधुर विपाकी आणि शीत वीर्य आहे तर कुलत्थ अम्ल विपाकी उष्ण वीर्य आहे या प्रकारचे वैषम्य म्हणता येर्इल.
  2. समता विरोध दूध व पपनस हे दोन्ही मधुर विपाकी, शीत वीर्य असुनही प्रभावाने विरोधी आहेत.
  3. समविषमता विरोध दूध व मासे एकत्रित खाणे दूध मधुर, शीत वीर्य तर मासे हे मधुर , उष्ण वीर्य व दोघांचा विपाक मधुर म्हणजे यात काही समता तर काही विषमता असते. येथे रस, विपाक समान असून वीर्य वेगळे असल्याने विरूध्दता येते.
  4. संस्कार विरोध दही तापविले असता अहितकर होते
  5. मात्रा विरोध घी व मध समप्रमाणात घेणे.
  6. देश विरूध्द वाळवंटी प्रदेशात शेती करणे, मृत व्यक्तीस उदृवर्तन करणे.
  7. कालविरोध रात्री दही किंवा सातू खाणे हे काल विरोधाचे लक्षण आहे.
  8. संयोग विरोध सत्तू हे रात्री पाणी मिसळून घेतले तर अधिक अहितकर ठरतात.
  9. स्वभाव विरोध काही द्रव्ये स्वभावत:च शरीरास अहितकर ठरतात. उदा. मेंढीचे दूध किंवा मोहरीची पालेभाजी.

विरोधी आहार
जे आहारद्रव्य अथवा औषधी द्रव्य दोषप्रकोप करते पण प्रकोपित दोषांना शरीराबाहेर काढून टाकत नाही ते आहारद्रव्य अहितकरच होय.
‘देहधातूप्रत्यनीकभूतनि द्रव्याणि देहधातुविरोधमापद्यते’
त्या आहार विरोधी द्रव्यांचे देश कालमात्रादिनुसार १८ प्रकार चरकसंहितेत वर्णिलेले आहेत.

  1. देशविरूध्द धन्वन (जांगल) देशात रूक्ष, तीक्ष्ण आहाराचे सेवन तसेच आनुप देशात स्निग्ध, शीत द्रव्यांचे सेवन.
  2. कालविरूध्द शीत काळात शीत व रूक्ष पदार्थांचे सेवन तर उष्ण काळात कटुरसात्मक ऊष्ण वीर्यात्मक आहार. रात्री थंड फ्रीज मधले पाणी पिणे, आइस्क्रिम खाणे.
  3. अग्निविरूध्द मृदु मध्य तीक्ष्ण आणि विषम असे चार प्रकारचे अग्नि असतात त्यानुसार आहार न घेणे. तीक्ष्ण खूप भूक असतांना सटर फटर हलके खाणे किंवा अल्प भूक असतांना श्रीखंडासारखे पदार्थांचे खाणे.
  4. मात्राविरूध्द मध आणि घी सम प्रमाणात समभाग मध व पावसाचे पाणी,
  5. साम्य विरूध्द ज्या व्यक्तीना कटुरस उष्णवीर्यात्म आहार घेण्याची सवय झाली असेल त्यांनी मधुर शीतवीर्यात्मक आहाराचे सेवन करणे.
  6. जे आपल्या शरीरास सुखकारक होते त्यास सात्म्य म्हणतात. साम्य ३ प्रकारचे असते.१) प्रवर (श्रेष्ठ), २) अवर (हीन) ३) मध्य ..सर्व रसात्मक आहार श्रेष्ठ असून त्याचा नेहमी अभ्यास असावा.
    ‘सर्वरसाभ्यासो बल एकरसाभ्यासो दौर्बल्यकारणम्’

  7. दोष विरूध्द वाज पित्त कफ दोषांमध्ये समान गुणाचे अन्न औषध व उपक्रमांचा नित्य अभ्यास करणे हे दोषविरूध्द होय.
  8. संस्कारविरूध्द मोराचे मांस एरंडाच्या काडीस लावून भाजने.
  9. वीर्य विरूध्द शीत वीर्य द्रव्य, उष्णवीर्यांत्मक द्रव्याबरोबर मिसळून देणे. दुध व मासे. दुध व कुळीथ.
  10. कोष्ठ विरूध्द क्रूर कोष्ठ रूग्णांस मृदु विरेचण व मृदु कोष्ठीस तीक्ष्ण विरेचण.
  11. अवस्था विरूध्द परिश्रम, मैथुन, व्यायाम करणार्र्या व्यक्तीस वातकर आहार देणे किंवा अध्कि निद्रा घेणार्र्यास कफ वर्धक आहार देणे हे अवस्था विरूध्द आहे.
  12. क्रमविरूध्द जी व्यक्ती मल मूत्रांचा त्याग न करता वा भूक नसतांना भोजन करते अथवा खूप भूक लागल्यावरच भोजन करते हे क्रम विरूध्द आहे.
  13. परिहार विरूध्द वराहमांसादि उष्णवीर्य मांस खावून पुन्हा त्यावर उष्णवीर्य पदार्थांचे सेवन करणे. मटन मच्छी तेलकट तळलेल्या पदार्थी नंतर कोल्ड्रींग्ज किंवा आयस्क्रीम खाणे
  14. उपचार विरूध्द घृतादि स्निग्ध पदार्थींच्या सेवना नंतर थंडपाणी पिणे.
  15. पाक विरूध्द दुष्ट लाकुड वा धुर व दुर्गंध निर्माण करणारे लाकूड यांच्या सहाय्याने भाज, मोराचे मांस एरंडाच्या लाकडावर भाजणे, पारव्याचे मांस कळंबाच्या लाकडावर भाजणे. बगळाचे मांस डुकराच्या चरबीत भाजून खाले असता लवकरच मृत्यू येतो.
  16. संयोग विरूध्द अम्लरस व लवण रस दूधाबरोबर सेवन करणे.

महाळूंग,लिंबू,कारवंद,शेवग्याच्या शेंगा,बोर,चिंचा,जांबूळ,कवठ,आक्रोड,फणस,नारळ,डाळींब केळ, सफारचंद,स्ट्राबेरी,पायनापल,द्राक्ष,ताडगोळे आवळा व या जातीची अन्य द्रव्यं आणि सर्व प्रकारचे द्रव वा शूष्का अम्ल पदार्थ दुधाशी विरूध्द असल्याने दूधा बरोबर खावू नये. कांग,वनमूग मठ, कुळीथ,पावटा हेही दुधाशी विरूध्द आहे. दुधाबरोबर मीठ खारट नमकीन खारे बिस्कीटस, खारी, सलवण भात,पोळी, भाकरी,फरसाण तसेच दुध असलेल्या चहा कापी बरोबर हे पदार्थ खाणे हे विरूध्द आहारच आहेत. मिल्क सेक, फ्रूटयुक्तआइस्क्रिमस, पाव भाजी, मांसाहार नंतर आइ स्क्रिम खाणे हे विरूध्द आहरच होय.
मिल्कसेक दूध + फळ

apple

 

बांबूच्या कोवळया पालवीची भाजी किंवा वढरफल (क्षुद्र फणस) मध व दुधा बरोबर खावू नये, खाल्यास मृत्यू किंवा बल,वर्ण,तेज व वीर्य नाश होतो. वढरफळ, उडीद दाळ ,गूळ व घी सेवन करू नये.
ग्राम्य, आनूप आणि जलचर प्राण्यांचे मांस हे मध तीळ, गूळ,उडीद, मुळा,कमळाचा देठ, मोड आलेले कडधान्य या पदार्थी बरोबर खावू नये. खाल्यास बाधीर्य ,आंधअळेण्णा,कंप,जाड्य, बोबडेपणा,गेंगणेपणा,मूकत्व हे विकार उत्पन्न होतात. ह्या क्वचित मृत्यूही येऊ शकतो.
क्वचित प्रसंगी दुधाबरोबर अपवादात्मक फळात चिकू,सिताफळ,व आबंट नसलेला पिकलेला आंबा .खाण्यास हरकत नसते.

  1. अह्सदय जो आहार द्रव्य मनाला न आवडणारा तो.
  2. संपत विरूध्द आहार द्रव्य किंवा औषधी द्रव्य पूर्ण रसयुक्त होण्याआधीच किंवा रस विकृत झाला असताना वापरले गेले तर संपत विरूध्द होय.
  3. विधि विरूध्द भोजनाचे काही विधी आहेत. एकान्तात भोजन करू नये, भोज्य पदार्थ उष्ण, स्निग्ध असावेत आदि भोजन करतांना व भोज्य पदार्थाचे काही नियम दिले आहेत त्याचे पालन न करता भोजन करणे हे विधिविरोधी होय.

विविध फळे भाज्या अन्न पदार्थ अधिक काळ टिकावेत, ताजे दिसावेत, त्यासाठी त्यांच्यावर काही प्रक्रीया केल्या जातात, उदा. गुळ साखरेस शुभ्रता येण्यासाठी सल्फोनशेनादि प्रक्रिया केली जाते , आंबा सारख्या फळांना लवकर पिकविण्यासाठी रसायनी पावडर वापरली जाते. फळांचे रस,ज्युस,जाम,जेली,सरबते,कोल्ड्रींगज,चीज,बटर,दूध.लोणी,लोणची,आदि खाद्य पदार्थ अधिक काळ टिकावेत म्हणून त्यात रासायनिक प्रिर्जविटीज व रंग स्वादासाठी कृत्रिम द्रव्यांचा वापर ही शरीरास घातक असल्याचे सिध्द झाले असले तरी आपल्या देशात त्यावर बंदी नाही. फळे पालेभाज्या, अन्न धान्य लवकर व भरपुर यावे त्यासाठी कृत्रिम खते, किटक नाशकांची फवारणी ह्याचा परीणाम कर्क रोगासारख्या विकांराचे वाढलेले प्रमाण होय. हे सर्व सामाजिक व नैतिक जबाबदारीचे असून नैसर्गिक प्रक्रिये विरूध्द आहे.
विरूध्द आहार सेवन जन्य विकार नपूंसकता, आंध्य, विसर्प,उदर विस्फोट,उन्माद,भगंदर,मूचर्छो,मद,आध्मान,गलग्रह,पाण्डू,आमविष,किलास,कुष्ठ,ग्रहणी,शोथ,अम्लपित्त,ज्वर,पिनस,संतानदोष,तथा मृत्यु हे सर्व विकार विरूध्द अन्न सेवनाने होतात.
ह्यांची चिकित्सा ही वमन विरेचनादि शोधन उपचाराने किंवा त्या रोगानुसार करावी. जो विरूध्द अन्नास सात्म्य आहे, ज्यांचा अग्नि चांगला आहे, नित्य व्यायाम करतो. तरूण आहे अशा व्यक्तीनी थोडया प्रमाणात विरूध्दाशन केले तरी काही फरक पडत नाही.

आहारविधि
विधान आहार हा उष्ण, स्निग्ध,योग्य मात्रेत,पहिला आहार पचल्यानंतर ,परस्पर वीर्य नसलेला ,इष्टदेशी व इष्ट व सर्व उपकरणे असणारा फार भरभर वा फार हळूहळू न घेतला जाणारा, फार बडबड, वा हसता न करता, स्वत:कडे यधा योग्य लक्ष देत घेतला जाणारा आहार असवा.
हे आहार विधिचे विधान स्वस्थय व आतुर या दोघांसाठी असून यासाठी आत्मपरीक्षण करून यथायोग्य आहार घ्यावा

षट्ररसात्मक आहार
मधुर,अम्ल,लवण,तिक्त,कटु व कषाय असे सहा रस असून योग्य मात्रेत त्यांचा उपयोग केले असता शरीरास उपकारक होतात आणि अयोग्य प्रमाणात वापर झाल्यास दोष प्रकोप होतो अर्थात विकार निर्माण होतात.
तत्राद्या मारूतं घ्नन्ति त्रयस्तितादय:कफम् |
कषायतित्कमधुरा: पित्तमन्ये तु कुर्वते | वा.सू १
मधुर अम्ल लवण रसात्मक द्रव्यात्मक आहाराचे सतत सेवन केले असता ते कफा वर्धक होते व त्याच रसात्मक द्रव्यांनी वाताचे शमन होते तर तिक्त कटू कषाय रसाने वात वृध्दि व कफाचे शमन आणि काषाय ,तिक्त मधुर रसाने पित्ताचे शमन व अम्ल, लवण, कटु रसात्मक द्रव्यानीं वृध्दि होते. समान गुणात्मक द्रव्याने समानाची वृध्दी व विपरीताचा क्षय होतो
‘वृध्दि: समानै: सर्वेषा विपरीतैविपर्यय:|’


रस

वृध्दि

शमन

मधुर,अम्ल,लवण

कफ

वात

तिक्त,कटू,कषाय

वात

कफ

काषाय,तिक्त,मधुर

पित्त

 

अम्ल,लवण,कटू

 

पित्त

ह्या सहा रसांची उत्पत्ती ही पंचमहाभूतापासून होते. आकाशातुन प्राप्त होणारे आंतरीक्ष जल सौम्ल, शीत लघु आणि अव्यक्त रसयुक्त असते. आकाशातून खाली येतांना त्या मध्ये पंचमहाभूताचे सर्व गुण उतरतात,असे हे जल जाडगम आणि स्थावर पदार्थांना तृप्त करते व त्यामूळे या पदार्थांचे सहा रस अभिव्यक्त होतात. जल हे रसाच्या अभिव्यक्तीचे प्रमुख साधन आहे. मधुरदि रस व महाभूतात्मक आधिक्य

रस महाभूत

  1. मधुर जल+पृथ्वी
  2. अम्ल पृथ्वी+अग्नि
  3. लवण जल+अग्नि
  4. कटू वायु+अग्नि
  5. तिक्त वायु+ आकाश
  6. कषाय वायु+पृथ्वी

सहा रसांचे गुणकर्म
मधुर रस स्नेहन, प्रीणन, आल्हाद, मार्दंव ,स्थिरता गुरू,शीत या गुणांनी मुखस्थित रस मुखामध्ये सर्वत्र पसरतो आणि सर्व मुखाला लिप्त करतो.
हा रस शरीरास सात्म्य असल्याने रस, रक्त, मांस आदि सर्व धातूना वाढविणारा, आयुकारक,पंचज्ञानेंद्रिय व मनास प्रसन्न करणारा,बल व वर्णवृध्दिकर, वातपित्त शामक,तृष्णा व दाहशामक, त्वच्य, केश्य नेत्र्य,कंठय, क्षीणतेचा नाश करणारा ,क्षतपूर्ति करणारा, संधान करणारा
भृंगा मधमाशी मुंग्यादि सहा पायाच्या किटकांना प्रिय असतो.
अतिसेवनाने स्थौल्य मृदुता, आलस्य, गौरव अरूचि, अनन्नाभिलाषा, अग्निदौर्बल्य, गलकंठय प्रदेशी मांसवृध्दी श्वास, कास प्रतिश्याय, छर्दि, संज्ञानाश, स्वरनाश, गलगंड गंडमाला, श्र्लिपद नेत्राभिष्यंद हे कफविकार निर्माण होतात.
अम्लरस दंतहर्ष मुखस्राव, स्वदेन आणि रसबोधन जीभेवर ठेवताच ज्याचे ज्ञान होते, जो गल आणि मूखप्रदेशी दाह उत्पन्न करतो.
अम्लरस हा आहारात रूची उत्पन्न करतो. अग्निप्रज्वलीत, अन्नाला क्लिन्नता आणतो, पाचन करतो हद्यास तर्पण करतो.(हर्र्दय) बलवृध्दीकर. वातानुलोमन मनाला प्रसन्न करतो, अम्लरस हा लघु, उष्ण व स्निग्ध असतो.
अतिसेवन केले असता दंतहर्ष तृष्णा, डोळे बंद होणे. लोमकांप,रक्तदुष्टी कफविलयन, पित्तप्रकोप,मांसपेशीत दाह व शरीरात शैथिल्य उत्पन्न करतो क्षीण क्षतदुर्बल यामध्ये शोध उत्पन्न करतो, व्रणात पाक निर्माण करतो. गल,कंठ,उर हर्र्द प्रदेशी दाह उत्पन्न करतो.
लवणरस जो तोंडात ठेवल्याबरोबर विरघळतो. शुष्कमुखात क्लेद निर्माण करतो. लालास्राव मुखदाह, निर्माण करतो.
लवन रस हा पाचन, क्लेदन, दीपन, च्यावन. छेदन .तीक्ष्ण सर विकासी मलाला अधोमार्गाने बाहेर काढणारा अवकाशकारक, वातकाशक,स्तंभ,बंध संघात यांचा नाश करणारा,सर्वरसप्रत्यनीकभूत- सर्व रसात आपली अभिव्यक्ती दर्शविणारा, कफविष्यंदि स्रोतो शोधी. सर्वशरीर अवयवांना मृदुता आणणारा, आहाराची रूची वाढविणारा असून, प्रत्येक आहार द्रव्याबरोबर वापरला जाणारा असतो लवणरस अति गुरू नाही. तो स्निग्ध उष्ण असतो.
अतिसेवनाने पित्तप्रकोप- रक्तवृध्दि होते. तृष्णा वाढते, शरीरातील उष्मा वाढतो, मूचर्छो येते. कफदरण, कुषठात मांसकोथ विषवृध्दि, शोथाचे स्फुटन दंतपतन, पुरूषत्वहानी, इंद्रियांच्या ठिकाणी शैथिल्य – शरीरावर सुरकत्या पडणे केस पिकणे गळणे ही लक्षणे लवण रसाच्या अतिसेवनाने होतात. रक्तपित्त अम्लपित्त, विसर्प-वातरक्त विचर्चिका इंद्रलुप्त यासारखे विकार निर्माण होतात.
कटुरस जीभेवर ठेवल्या बरोबर दाह, तोद, उत्पन्न होतो व ज्याने मुख,नसिका, नेत्र, याठिकाणी स्राव उत्पन्न होतो.
कटुरस मुखशुध्दि करतो, अग्नि प्रदीप्त करतो, खालेल्या अन्नातील द्रव्यांशाचे शोषण करतो. नासास्राव चक्षुस्राव वाढवितो. इंद्रिये विमल करतो, या कटु रसाने मुख विकार दुर होतात. अलसक शोथ उपचय,उदर्द अभिष्यंद,स्नेह,स्वेद. क्लेद आदिंचा नाश कटु रसाने होतो. कटुरस आहार रूचिर बनवितो. कंडू नाशक व्रणाचे अवसादन करतो. कृमीघ्न असून शोणित संघात दुर करणारा असून कफा शामक लघु, उष्ण आणि रूक्ष आहे.
अतिसेवनाने विपाकप्रभावाने तो पुंसत्वाचा नाश करतो. आपल्या रस वीर्यामूळे मोह उत्पन्न करतो. हर्षक्षय, अवसाद, कार्श्य मुर्च्छा शरीरवक्रता, तम:प्रवेश भम, कांठदाह शरीरोष्मा वाढणे बलहानी , तृष्णा ही लक्षणे उत्पन्न करतो, वायु व अग्नि गुणाच्या बाहुल्यामुळे भ्रम छिर्दि कंप तोद, भेद आदि वातविकार हातपाय पार्श्व, पृष्ठप्रदेशी उत्पन्न करतो.
तिक्तरस जीभेवर ठेवल्या क्षणीच जो जीभेस कष्टदायक ठरतो आणि अन्यरसस्वाद नष्ट करतो. मुखवैरस्यता नाहीसी करून मनास प्रसन्नता आणि रूची निर्माण करतो. विष,कृमी नाशक,मूर्च्छादाह,कण्डू कुष्ठ तृष्णा यांच शमन करणारा,त्वचा व मांस हयाना स्थिरता देणारा,ज्वरघ्न,दीपन,पाचन,स्तन्यशोधन,लेखन,क्लेद मेद, वसा मज्जा, लसीका,पूय ’ स्वेद मूत्र,पुरीष पित्त कफ यांचे शोषण करणारा, तिक्तरस हा रूक्ष शीत आणि लघु असतो.
अतिसेवनाने त्याच्या रूक्ष खर आणि विशद स्वभावामूळे रस रक्त, मांस मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र धातूचे शोषण होते. स्रोतसात खरत्व येते बलहानी, कार्श्य,हर्षक्षय,मोह,भ्रम,मुखशुष्काता,आणि वातविकारांची उत्पत्ति होते.
कषायरस ज्यारसाने वैशद्य निर्माण होते परंतू जिव्हास्तंभ, जिव्हाजाड्य उत्पन्न होते, कंठात अवरोध जाणवतो, जो विकाशी गुणाचा आणि ओजाच्या पिच्छील गुणाचा नाश करतो.
कषाय रस दोष शमन, संग्राही ,संधानकारक, पीडन, रोपण,शोषण, कफपित्त रक्तप्रशमन करणारा,क्लेदघ्न असून रूक्ष,शीत आणि गुरू गुणांचा असतो.
कषाय रसाच्या अतिसेवनाने आस्यशौष हद्यपीडा आध्मान वावानिग्रहण (अस्पष्ट बोलणे), स्रोतारोध वाढणे, शरीरश्यावता पुंस्वत्यहानी, विष्टंभ करून नंतर पचविणारा,वात मुत्र पुरीष रेत यांचा अवरोध करणारा, शरीरात कार्श्र्य मलीनता उत्पन्न करणारा, यामूळे तृष्णा स्तंभ उत्पन्न होतो, खर,विशद आणि रूक्ष असल्याने पक्षघात, ग्रह, अपतानक अर्दित आदि वातविकार होतात.
आपल्या आहारात मधुर रसाचे प्रामुख्याने प्रमाण अधिक असते कारण शरीरास आवश्यक पोषक अंश हे हया रसात्मक द्रव्याद्वारे प्राप्त होत असते व त्याचे सात्म्यही असते व अन्य रसांची जोड देवून आपला आहार हा सर्व रसात्मक असावा, ‘नित्यं सर्वरसाभ्यासा:’

मिथ्याहार, जंक फोस्ट फूड
चायनीज, वडापाव, पाव भाजी, सेव पुरी, पाणी पुरी, भेळ, मिसळ, भजी, समोसा,स्नोनका,गोळया,बिस्कीटस् चाकलेट्स केक, कन्फोशनरीज, बेकरी प्रोडक्टस् फरसान, वेफरस्, चीप्स, जाम, कुरडया,पापड,लोणची,विविध सरबते कोल्ड्रींग्जस बेवरीजेस् इ पदार्थ खाण्यास चमचमीत,चविष्ट स्वादिष्ट रोचक, आंबट, खारट, गोड,रूचकर, तेलकट असतात,हयात शरीरास आवश्यक घटक अंश योग्य प्रमाणात नसतात. फोट व कॅलरीज भरपुर प्रमाणात असुन प्रोटिन्स मिनरलस् व विटामिन्स ही अल्प प्रमाणात असतात. न्युट्रीटी व्हॅल्यू खूपच कमी असते व त्वाचे असते व त्या सर्वांचा अहितकर द्रव्यात समावेश करून त्याग करावा.

tapri

bhajipav   pavbhaji
     
bhajipav   pavbhaji
     
bhajipav   pavbhaji

 

 


प्रकृति अनुरूप आहार विहार
प्रकृति म्हणजे देह प्रकृति ही त्या व्यक्तीच्या जन्मापासूनच असते असे नव्हे तर ती गर्भधारणा होत असतांनाच ज्या दोषांचे अधिक्य असते ती त्या दोषाची प्रकृति बनते.
‘शुक्रशोणित संयोगे योभवेत् दोष उत्कट:| प्रकृतिजार्यते तेन’
जन्मापासुन मृत्यूपर्यंत प्रकृति कधीच बदलत नाही. ती शेवट पर्यंत कायम राहते.
‘जन्ममरणान्तरालभाविनि अविकारिणि दोषस्थिती प्रकृति|’ रसवैशेषिका सूत्र
वातच , पित्तज, कफज ह्या एकदोषज ३;
वातपित्तज, वातकफज, पित्तकफाज द्विदोषज द्वंदज ३ आणि
तीन दोषांची समप्रकृति अशा सात पकृत्यां असून समप्रकृतित दोष साम्यावस्थेत राहत असल्याने ती स्वस्थ प्रकृति, श्रेष्ठ होय. एकदोषज प्रकृति त्या त्या दोषांचे प्राधान्य असते व त्या सदा आतुर असतात म्हणून वातादि प्रकृतिच्या व्यक्तींनी स्वस्थ्यवृतांत सांगितलेल्या विपरीत गुणयुक्त आहार विहार करणे हितकर ठरते. समधातू प्रकृति असणार्र्या पुरूषांसाठी सर्वरसाभ्यासास सात्म्य होतो. वाग्भटातही सात्म्य होतो. वाग्यभटातही असेच म्हटले आहे –
‘नित्य सर्वसाभ्यास:स्वस्थाधिक्यमृतातृतौ’ वा,सू ३
वातप्रकृतिच्या व्यक्तीने कटु, तिक्त, कषाय आहार न घेता मधुराम्ल, लवण रसात्मक आहाराचे सेवन करावे. जर ऋतु व रोग आदिच्या अनुसार अन्य रसांचे सेवन करणे अनिवार्य असल्यास ते अल्पमात्रेतच घ्यावे. उदा. वात प्रकृतिच्या व्यक्तींनी हेमंतऋतुत कटु तिक्त कषाय स्वादु द्रव्या बरोबर सामान्य मात्रेत अम्ल लवणरसाचा प्रयोग करू शकतात. आणि कफ प्रकृति असल्यास विशेष स्वरूपात कटुतिक्तकषाय रसात्मक द्रव्यांचा प्रयोग करीत असतांना अल्प प्रमाणात स्निग्ध अम्ल लवणाचा उपयोग करू शकता. आणि समप्रकृतिच्या व्यक्ती सर्व रसा बरोबरच अम्ल लवण रसाचा प्राधान्याने सेवन करू शकता.
वातप्रकृतिच्या पुरूषामध्ये वातच रोग, पित्त प्रकृति असतांना पित्तज आणि कफाज प्रकृतिस कफज विकार अधिक प्रमाणात होतांना दिसतात. ते व्याधी त्या त्या व्यक्तीना अधिक बलवान ही असतात.
वातप्रकृतिचा व्यक्ती जेव्हा वातप्रकोपक आहार विहार सेवन करतो त्यावेळी त्याच्या शरीरात त्वरेने वातप्रकोप होतो. तितक्या शीर्घतेने अन्य दोन दोष प्रकुपित होत नाहीत हा प्रकोपित वात दोष विविध प्रकारच्या वातविकारामुळे बल, वर्ण तथा सुखायु नष्ट करतो. शरीरास पीडा करतो.
या वातविकारावर विधीवत स्नेह, स्देद, उष्ण मधुर अम्ल लवणयुक्त द्रव्यांचे मृदु संशोधन याच गुणांनी युक्त भोज्य पदार्थांचे सेवन, अभ्यंग उपनाह उन्मर्दन परिसेक अवगाहनल संवाहन अवपीडन वित्रासन विस्मापन विस्मरण सुरा आसव सेवन विविध प्रकारच्या स्नेह द्रव्यांना दीपनीय पचनीय वातनाशका विरेचक द्रव्यांचा संस्कार करून त्यांचा उपयोग करावा.
पित्तप्रकृति व्यक्तीस होणारे रोग व त्याची चिकित्सा घृतपान, विरेचण मधुर तिक्तकषाय,रसप्रधान औषध, आहार विहार यांचा यथा उपयोग , मृदु मधुर सुगंधित शीत तथा हदय अशा गंधाचे सेवन, अत्यंत शीत जलात ठेवलेल्या मुक्ता, मनीहार यांचे उरोभागी धारण आदि पित्तशामक औषधी व आहार विहार करावा.
कफाप्रकृतिसच्या व्यक्तीस होणारे रोग व चिकित्सा तीक्ष्ण उष्ण, कटू तिक्तकषाय रूक्ष औषधी व आहारात उपयोग,धावणे,उड्या मारणे पोहणे, आदि व्यायाम,तीक्ष्ण जुने मद्य सेवन, धुमपान, संपूर्ण लंघन, उष्ण घरात राहणे, सूखकारक उपकरनांचा त्याग करणे या सारखे उपचार करावेत
स्वास्थ्य रक्षणार्थ आणि विकार झाल्यावर औषधी योजना करतांना त्या व्यक्तीची जाणूनच आयूर्वेदिय वैद्य चिकित्सा करीत असतात. प्रकृति विनिश्चया संबंधी विविचन स्वतंत्रपणे पुढे येणार आहे.