Heathy Life सुखायु

आयुर्वेदाने हितायु, अहितायु, सुखायु आणि दु:खायु असे चार प्रकारचे आयुष्याचे मानले असून सर्व प्राणी मात्र आपले जीवन सुखदायक, आनंदी प्रसन्न असले पाहिजे हीच अपेक्षा ठेवतात व त्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न, धडफड असते. त्यासाठी आयुर्वेदाने स्वास्थ्य रक्षणार्थ दिनचर्या ,ऋतुचर्या, आहार विहार, पथ्यापथ्य, सद्वर्तन आदि गोष्टी सांगितल्या आहेत, त्याचे पालन केले असता निश्चितच आपले आयुष्य नीरोगी, निरामय राहील ह्यात शंका नाही.
आपल्या शरीराचे वात,पित्त, कफ हे तीन आधार स्तंभ असून सूर्य ,चंद्र आणि वायु हे विश्वाला धारण करतात. त्याच प्रमाणे हे वातादि दोष आपल्या शरीराला धारण करतात, म्हणुन त्यांना धातु म्हणतात. व त्या धातुत वैष्यम्य निर्माण झाल्यास शरीर विकारग्रस्त होते तर ह्यांच्यात साम्यावस्था टिकून राहिल्यास शरीर नीरोगी राहते.
‘विकारो धातुवैषम्यं, साम्य प्रकृतिरूच्यत्’
सुखसंज्ञकमारोग्यम्,विकारो दुखमेव च || च.सू ९
धातु म्हणजे वातादिदोष,रसरक्तादि धातु ,मूत्रपुरीषादि मल ..आणि रोगोत्पादकाचे सामर्थ्य हे केवळ दोषातच असते. वाग्भटात
‘रोगस्तु दोष वैषम्यं दोष साम्यं अरोगता’ असे म्हटले आहे.
केवल धातु वैषम्य म्हणजे मात्र रोग नव्हे. ह्या धातुवैषम्य किंवा दोषवैष्याच्या जोडीला जेव्हा दु:ख उत्पन्न होते तेव्हाच त्यास व्याधी असे म्हटले जाते. वय,अहोरात्र. भोजनकाल आणि ऋतु यामध्ये आढळणारे दोषवैषम्य हे दु:ख कारका नसल्याने त्यास व्याधी ही संज्ञा प्राप्त होऊ शकत नाही.
दु:ख या शब्दाने येथे शारीरिक व मानसिक या प्रकारच्या त्रासदायक संवेदना अपेक्षित आहेत. श्वित्रसारख्या व्याधीत शारीरिक वेदना जरी नसली तरी मानसिक क्लेश हा असतो म्हणून त्यास व्याधी ही संज्ञा प्राप्त होते.
समदोष: समाग्निश्च समधातुमलक्रिय: |
प्रसन्नात्मेन्द्रियमना: स्वस्थ इत्यभिधीयते || सु.सू.१५
वात, पित्त, कफ हे तीन दोष सम स्थितीत असणे, अग्नि सम असणे; रस,रक्त, मांस.मेद, अस्थि ,मज्जा,आणि शुक्र हे सात धातु समप्रमाणात असणे; मूत्र ,पुरीष व स्वेद ह्याच्या उत्सर्जित होण्याच्या क्रिया योग्य असणे; तसेच आत्मा ,पंचज्ञानेंद्रिय पंचकार्मेंद्रिय, आणि मन ह्याचे कार्य व्यवस्थित योग्य प्रकारे होणे व त्यांच्या ठिकाणी प्रसन्नता असणे ह्यास स्वस्थ्य म्हणावे. अशी च व्याख्या जागतिक आरोग्य संघटने केली आहे.
"The WHO defines health as " a state of complete physical, mental and social well-being and not merely the absence of disease or infirmity "
सुश्रुतातील व्याख्या ही खूपच समर्पंक व व्यापक आहे.
वात, पित्त,कफ हे तीन दोष असून वाताचे उत्साह, श्वास, निश्वास, चेष्टा, मलमूत्रांदिची प्रवृत्ति आदि ही प्राकृत कर्मे होत. वाताची वृध्दि झाली असता शरीरात रूक्षता ,लाघवता. कार्श्ये काक्ष्णा आदि लक्षणे निर्मांण होतात व क्षय झाला असता प्राकृत कर्मांची हानी, अंगसाद, कमी बोलणे ,इंद्रियाचे ज्ञान कमी होणे मोह या सारखी लक्षणे दिसतात,
दोषांचे प्राकृत कर्मं ;सम्यक होत राहणे; त्यांची गुणता किंवा कर्मंता वृध्दी किवा न क्षय होता. साम्यावस्था असणे म्हणजे आरोग्य होय.
अग्नि पाचकाग्नि जाठराग्नि आपण खालेल्या अन्नाचे परीणमन पचनाचे महत्वाचे कार्य अग्नि द्वारे होते. आहाराचे आहाररसात परीवर्तंनाचे कार्य पाचकाग्नि कडून होते व त्या आहारसाचे रसरक्तादि धातुत परीमनाचे कार्य रसरक्तादि धात्वाग्नि कडून होऊन ‘रसातरक्तं’ ही धातु परंपरा सुरू राहते आणि पांचभौतिक द्रव्यांचे रूपांतराचे कार्य भूताग्नि द्वारा होते.
आपल्या शरीरास आवश्यक असलेल्या भाव पदार्थांच्या निर्मितीत अग्निस अनन्य साधारण महत्व असून अग्निस शरीर धारणामध्ये महत्वाचे कारण समजले जाते. अग्निचे पाचकाग्नि, सात धातुंचे सात धात्वाग्नि आणि पांच महाभूतांचे पाच भूताग्नि असे १३ अग्नि प्रकार होतात, जाठराग्नि प्रमुख होय.
आयु,बल,वर्ण,स्वास्थ्य,उत्साह,उपचय,प्रभा,ओज,तेज, प्राण हे सर्व अग्नि वरच अवलंबून असते तो प्राकृत असे पर्यंत व्यक्ती निरामय जीवन जगते, तर अग्निच्या विकृतितून विविध रोग उत्पन्न होतात,’’ रोगा: सर्वेऽपि मंदेग्नो जायते’’ तसेच दोषांचा प्रशम वा प्रकोप हा ही अग्निवरच अवलंबून असतो. ‘शमप्रकोपौ सर्वेषां दोषाणां अग्नि संश्रितौ, तस्मात् अग्निं सदा रक्षेत् ‘आणि म्हणून प्रयत्न पूर्वंक अग्निचे रक्षण करावे.
धातु रस, रक्त, मांस,मेद अस्थि, मज्जा व शुक्रा हे सात धातु व पुरीष मूत्र व स्वेद हे स्थुल मल असून शरीराला धारण करण्याचे काम करतात ‘धारणात् धातव:’ म्हणून त्यांना धातु म्हणतात. त्यांचे प्राकृत कार्य
रस- प्रीणन;तर्पण व रक्ताचे पोषण.
रक्त- जीवन. वर्णप्रसादन ,मांसाचे पोषण
तसेच मांसाचे लेपन;मेदाचे स्नेहन.अस्थिचे धारण मज्जाचेपुरण आणि शुक्राचे गर्भोत्पादन तर पुरीषाचे उपष्टंभ वायु व अग्निस धारण करणे. मूत्राचे बस्तिपूरण क्ल्लेदवहन आणि स्वेदाचे क्लेद धारण ,शरीर व त्वचेस मार्दंवता आणण्याचे कार्य होते ह्या दोष धातु मला मूळे क्षय वृध्दी होवून धातू वैषम्य निर्माण होते अर्थात शरीरात विकृति येते. जसे रस क्षयाने ह्दय पीडा ,सर्वांग कांप तृष्न्णा. रक्तवृध्दिने शरीर अंगास व नेत्र आरक्तता .मांस क्षयाने बल क्षय (वजन कमी होणे), शुष्काता रूक्षता येते तर मेदो वृध्दीमूळे स्थौल्य अशी लक्षणे दिसतात.
वातादि दोष रसरक्तादि धातु मलमूत्रादि गुणत: व कार्यता सम्यक असणे व आत्मा ,पंचज्ञानेंद्रिये व पंचर्मेंद्रिये आणि मन ह्यांच्या ठिकाणी प्रसन्नता असणे स्वास्थाचे द्योतक आहे.
आपले आयुष्य सुखमय नीरोगी राहण्यासाठी आयुर्वेंदाने दिनचर्या ऋतुचर्या, आहार संकल्पना, पथ्यापथ्य.सद्ववृताचे पालन आदि हित-अहित गोष्टीचे विवेचन असून त्यांचे पालन आपले आयुष्य निश्चितच सुखायु होर्इल.
दिनचर्या

 

 

 

सद्ववृत पालन