अजीर्ण Indigestion,Dyspepsia.
अजीर्ण खालेल्या अन्नाचे पचन होवून त्या आहार रसाचे शरीरात शोषण होणे आवश्यक असते, तसे न होता अन्न न पचलेल्या स्थितीत अन्नवह स्रोतसात रहाणे या विकारास अजीर्ण असे म्हणतात.
स्वभाव आशुकारी ,कारण भेदाने दारूण
मार्ग अभ्यंतर मार्ग
प्रकार १) आमाजीर्ण कफप्रधान २) विदग्धाजर्ण पित्त प्रधान ३) विष्टब्धाजीर्ण वातप्रधान
४) रसशेषाजीर्ण ५) दिनपाकी
रोत जेवणानंतर काही काळ असणारे जे एक अवस्थारूप प्राकृत अजीर्ण त्यास प्रतिवासराजीर्ण अशी संज्ञा दिली आहे. रोज प्राप्त होणारी ही एक स्वभाविक स्थिति आहे तिला विकार मानण्याचे कारण नाही.
हेतु अत्यम्बुपानाद्विषमाशनाच्च संधारणात्स्वप्नविपर्ययाच्च І
कालेऽपि सात्म्यं लघु चापि भुक्तमन्नं न पाकंनरस्य ІІ
र्इर्ष्याभयक्रोधपरिप्लुतेन लुब्धेन रूग्दैन्य निपीडितेन І
प्रद्वेषयुक्तेन च सेव्यमानमन्नं न सम्यक परिपाकमेति І
मात्रयाऽप्यभ्यवहर्र्त पथ्यं चान्नं न जीर्यति І
चिन्ताशोकभयक्रोधदु:खशय्याप्रजागरै: ІІ मा.नि
अनात्मवण्त: पशुवदभुज्जते येऽप्रमाणात: І
रोगनीकस्य ते मूलमजीर्ण प्राप्नुवन्ति हि ІІ मा.नि
आहारासंबीचा कोणताही नियम न पाळता सारखे चरत रहाणे हे अजीर्णाचे महत्वाचे कारण आहे. या व्यतिरिक्त फार पाणी पिणे,विषमाशन,वेग विधारण,रात्री जागरण,दिवास्वाप, गुरू, स्निग्ध,विदाही अशुध्द व विरूध्द असे अन्न खाणे.लोभ,चिंता,शोक,भय,क्रोध,र्इर्ष्या,यामूळे मन अप्रसन्न असतांना जेवणे, निरनिराळया व्याधीनी शरीर क्षीण होणे या कारणाने अजीर्ण उत्पनन होते, भूक लागली नसतांना खाणे रोगोत्पादक आहेच पण काही वेळेस लागलेली भूकही खरी नसते. खोटी भूकेचे लक्षण-
दोषोपनध्दं यदि लीनमन्नं І पित्तोल्बणस्यावृणुयान्नवहिनं जायेत दुष्टा तु ततो बुभुक्षा І
या मंद बुध्दि विषवन्निहन्तिІ अ,सं सू ११
द्रवरुपपित्त वाढते, कफपित्ताने अवरोध झाल्यामुळे अन्ना कोष्ठच्या भागात लीन होऊन स्थिरावते व द्रवरुप पित्ताशी त्या अन्नाचा जसा यावयास पाहिजे तसा संबध येत नाही पित्ताच्या स्थितीत उष्णतीष्णादि अग्निगुण अल्पप्रमाणात का होर्इल पणा असतातच व त्यांच्या अस्तित्वामुळे इतर भागात क्षोभ होऊन भुका लागल्यासारखी वाटते. ही भूक खरी नव्हे खोटी हे लक्षात न घेता जर घेतला तर त्यामुळे पीडा झाल्याविना राहत नाही.
अन्नाच्या पचनासाठी उदीरत होणारे कफ पित्त यांना अन्न सेवनाचे काल वा अन्नातील यांच्या वैगुण्यामुळे दुष्टता प्राप्त होते. त्यामुळे पचनाचे कार्य जसे व्हावयास पाहिजे तसे होत नाही अर्थात सारकिट विभजनास वाव न राहिल्याने अन्न हे पचता आंबते शुक्त होते क्लिन्न होते. विषरुप दुष्ट दोष या आमाशी मिसळून त्यामूळे विकार उत्पन्न होतात.
पथ्य अपथ्य मिश्रीत करुन खाण्यास समशन ,खाल्यावर पुन्हा खाणे अध्यशन आणि असमयी खूप किंवा थोडे खाणे विषमाशन होय, हे तीनही मृत्यु अथवा भयानक रोगास उत्पन्न करतात.
रुपे-लक्षणें
भूक नसणे, तोंडाला चव नसणे, पोट जड वाटणे, अम्ग गळून जाणे, वायु कोंडून राहणे मलप्रवृति साफ न होणे. मल प्रवृतिच्या वेळी कांथावे लागणे किंवा धोडी द्रवमल प्रवृति असते, डोके दुखणे, चक्कर आल्यासारखे वाटणे, अंग दुखणे, तहान लागणे, जांभया येणे. उलटी सारखे वाटणे, ज्वर येणे, पाठ कांबर याठिकाणी वेदना होतात, मूर्च्छा येते. ही अजीर्ण रोगाची लक्षणे आहेत.
वातप्रधान ता असतांना शूल, आनाह, अंगमर्द, मुखशोथ, मूर्च्छा,भम्र,पचन वैषम्य,पार्श्व पृष्ठ कटि शूल,सिरा संकोच,स्तंभन ही लक्षणे होतात,
काफाप्रधानता असतांना छर्दी, अरोचक अविपाक, शीतपूर्वंक ज्वर, आलस्य अम्ग जड होणे, ही लक्षणे होतात.
आमाजीर्ण कफ दोषामूळे अन्न मधुरीभुत होते. या विकारात पोटात अतिशय जडपणा वाटतो, अन्न घशासी येते, तोंडाला पाणी सुटते, गंड व अक्षिकुट येथे शोध येतो, अंगाला खाज येते, जे पदार्थ खाले असेल त्याच्या वासाची ढेकर येते. टवचा व मलास स्निग्धता असते.
विदग्धाजीर्ण पित्त विकृतिमूळे अन्न अम्लीभूत होते. घशासी आंबट येणे, जळजळणे, आग होणे. उलटी येणे, आंबट तिखट कडवट असे घसाशी येणे वा उलटी होणे ज्वर भ्रम तृष्णा मूर्च्छा,ही लक्षणे असणे हे विदग्धाजीर्णाचे स्वरूप आहे.
विष्टब्धाजीर्ण या प्रकारात वातप्रकोप असतो. या मध्ये विविध प्रकारचा शूल आध्मान अंगमर्द, शिर:शूल कटिपृष्ठवेदना मल व वाताची प्रवृति होत नाही. स्तंभ मोह ही लक्षणे होतात,
रसशेषाजीर्ण रसशेषाजीर्णात अन्नवह स्रोतसच्या पेक्षा अन्नवहस्रोताशी संबध्द अशी रसवह स्रोतसे न उपयोजिलेल्या गेलेल्या आहाररसाने पूर्ण झालेली असतात, इतर तीन अजीर्णीची दृष्टी साक्षात अन्नवह स्रोतसात असते अपक्का अन्न हे तेथे कारण असते. जाठराग्निचे मांद्य या विकारांना उत्पन्न करते. रसशेषाजीर्ण
धात्वाग्निमांद्याचे द्योतका आहे,जाठराग्निच्या कार्यक्षमतेच्या अपेक्षेने धात्वाग्निची कार्यक्षमता उणावलेली असल्यास जाठराग्निचे निर्माण केलेला आहार रसदिधात्वाग्नि पचवू शकत नाही. व न पचलेला आहार रस रसवहस्रोतसात शिल्लक राहातो आणि त्यामूळे या विकारात लालाप्रसेक, हर्र्दयगौरव, अन्नावर वासना नसणे, अंग जड वाटणे, आळस अशी लक्षणे असतात.
ढेकर आली तर मात्र शूध्द येते हे अन्नवह स्रोतसाची दृष्टी नसल्याचे लक्षण आहे. मुखावर स्निग्धता दिसते, डोके जड होते, सांध्याच्याठिकाणी अल्प प्रमाणात वेदना असतात.
दिनपाकी अजीर्ण हयाचे स्वरूप अगदी सौम्य असते, आध्मानादि त्रासदायक लक्षणे अल्प प्रमाणात आढळतात. तसेच या अवस्थेत चांगली भूका लागेपर्यंत जेवणे पुन्हा बाधक होते एक दिवस तरी लंघन करणे इष्ट असते.
उपद्रव मूर्च्छा ,प्रलाप,प्रसेक, छर्दि, अंगमर्द, भ्रम, आणि अतियोगाने मृत्यू ही येऊ शकतो.
उदर्कं अग्निमांद्य व शूल अलसक विलंबिका.
व्याधी मुक्तीची लक्षणे उग्दारशुध्दिरूत्साहो वेगोत्सर्गो यथोचित:І
लघुता क्षुत्पिपासा च जीर्णोहारस्य लक्षणम ІІ
स्वच्छ व शुध्द ढेकर येणे, उत्साह वाटणे, मलमुत्रांचे वेग योग्य प्रकारे येणे, भूक तहान योग्य प्रमाणात असणे, आणि हलकेपणा वाटणे ही लक्षणे अजीर्णं व्याधी बरे झाल्याची आहेत,
साध्यासाध्यत्व अजीर्ण व्याधी साध्य व रसशेषाजीर्ण कष्ट साध्य.
रिष्ट लक्षणें प्रलाप मूर्च्छा.
चिकित्सा सूत्र तत्रामे लंघन कार्यं विदग्धे वमनं हितम І
विष्टब्धे स्वेदनं पथ्यं रसशेषे शयीत च ІІ
वायमेदाशु तं तस्मादुष्णेन लवणाम्बुना І
कार्यं वाऽनशनं तावद्यावन्न प्रकृतिं भजेत् ІІ अ ह. सू८
आमाजीर्णावर- लंघन , विदग्धाजीर्णावर –कोष्ण लवण जलाचे वमन द्यावे;
विष्टब्धाजीर्णावर –स्वेदन, रसशेषजीर्णावर- दिवसा न जेवता अनशपोटी झोपावे;
या व्यातिरीक्त लंघन , पाचका स्वेदनादि उपचार करावेत. जोपर्यंत अन्न पचन पुन्हा प्राकृत स्थितीत येत नाही दोष सम होत नाहीत वा बल पुर्वीप्रमाणे वाटत नाही उपचार चालू ठेवावेत. अग्निमाद्य अजीर्ण आणि ग्रहणी यामुध्ये अग्निचे दीपन पाचन करण्यासाठी कटु अम्ल लवण रसाची तीक्ष्ण उष्ण लघु दीपका पाचक अनुलोमक द्रव्यांचा उपयोग केला जातो व ही सर्व सामान्यपणे सारखीच असतात, व बहुतेक औषधी कल्प ही ह्या तीन ही विकारात वापरली जातात व त्या औषधी कल्पांचा सखोल विचार ग्रहणी विकारात केलेला आहे.