अग्निमांद्य – Anorexia – (Loss of Appetite)

अग्निमांद्य अग्निचे पचन सामर्थ विकृत होऊन धातुंचे पोषण नीट होत नाही, धातु पोषणाची क्रिया मंदावल्यामूळे या व्याधीस अग्निमांद्य म्हणतात. Decreased appetite is when you havea reduced desire to eat. The medical term a loss of appetite is anorexia.
स्वभाव चिरकारी, भिषक मोहकर
मार्ग आभ्यंतर
अग्निमांद्याची कारणे – अभोजन – मूळीच न जेवणे,अति जेवणे,विषमाशनात, असात्म्य,गुरू,अतिशीत,अतिरूक्ष,दुष्ट शीळे,नासलेले, विषयुक्त,भोजन.पंचकर्मांचा मिथ्यायोग, निरनिराळया व्याधींनी क्षीण होणे देश, काल,ऋतु ह्यांचे वैषम्य असणे,वेग विधारण करणे, चिंता शोका भयादि मानसिक व्यथा असणे.कोणत्या न कोणत्या प्रकारचे दु:ख जागरण यामूळे अग्नि दुष्ट होतो.
संप्राप्ति आहारविहारदि कारणांनी दोष प्रक्यपित्त होऊन अग्निला विगुण करतात.दोघांना विगुण करणारा अग्निच असतो. ते च प्रायशो दुष्यंति अग्निदोषात  अ,सं शा.६
रूपे
विषमो वातजान् रोगान् तीक्ष्ण:पित्तनिमित्तजान |
करोत्यग्निस्तथा मन्दो विकारान कफसंभवान ||
मंदाग्नि थोडेसे खालेल्या अन्नाचे पचन न होणे. हे कफज अग्निमांद्याचे लक्षण असून यामूळे निरनिराळे कफाज विकार उत्पन्न होतात.
विषम अग्निमांद्य अन्न केव्हा तरी पचते तर केव्हा पचत नाही.हे विषम किंवा वातज अग्निमांद्याचे स्वरूप असून यामुळे निरनिराळे वातज विकार उत्पन्न होतात.
तीक्ष्णाग्नि कितीही प्रमाणात खाले असता ते पचून भस्म होणे वा विदाह होणे हे तीक्ष्णा अग्निचे स्वरूप आहे. यासच पित्तज अग्निमांद्य म्हणतात. भरपुर मात्रेत व गुरूणात्मका आहाराचे सेवन केले असतानां ही हा तीक्ष्ण अग्नि त्या आहाराचे अल्प वेळातच पचन करीत असल्याने पुरेसे इंधन न मिळाल्यानेइ ह्या तीक्ष्णा अग्नि कडून शरीरस्थ धातुंचे पाचन होते व धातु क्षया सारखी लक्षणे निर्माण होतात,
विषमो धातुवैषम्यं करोति विषमं पचनम |तीक्ष्णो मन्देन्धनो धातुन् विशोषयति पावक||च.चि१५
अग्निच्या चार प्रकारापैकी समाग्नि हा श्रेष्ठ आहे. चरकाने अग्निमांद्याचा परिणाम अन्नविषामध्ये होतो असे सांगुन त्यामूळे उत्पन्न होणार्र्या विकारांचे वर्णंन केले आहे.
भूक न लागणे,उदर गौरव, आलस्य, अरति, उदरात वातसंचय,करपट ढेकर येणे, दुर्गंधित वात,शिथिल मलप्रवृत्ती, मूत्रप्रवृत्ती अनियमित,सदोष गढूळ, अल्पनिद्रा,चिडचिडेपणा,मुखदुर्गंधि अशी लक्षणे आढळतात, बहुतेक लक्षणे अजीर्णा सारखी असुन अजीर्ण हा व्याधी आश१कारी, विशिष्ठ कारणांनी घडलेला आणि थोडया काळातील लंघनादि उपचाराने बरा होणारा असतो. वरील लक्षणे मधुन मधुन अस्पष्ट प्रमाणात पण सतत आलटून पालटून होत राहणे हे अग्निमांद्याचे द्योतक आहे.
अजीर्णांची बहुतेक सर्वं लक्षणे अपक्व अन्नाच्या प्रभूततेमूळे बहुधा अन्नवहस्रोतसाच्या आश्रयाने प्रकट होतात. अग्निमांद्याव्यस्थेत मात्र अजीर्णाच्या मानाने उत्पन्न झालेला आम द्रव्याचे स्वरूप सौम्य असते. शरीरातील इतर व्यापार कार्यक्षम असल्याने नेहमीप्रमाणे आहाररसाच्या शोषणात व्यत्यय आलेला नसतो त्यामूळे उत्तम रीतिने न पचलेल्या अशूध्द स्थितील आहाररसाचेही शोषण होत राहते प्रकुपित्त झालेले दोष या बरोबर असतातच म्हणूनच त्यांना साम दोष ही संज्ञा प्राप्त होते. रसवहस्रोतसा पासून त्याच्या सर्व शरीरभर संचार होतो व अनेक विकार उत्पन्न होतात.
चरकाने अग्निमांद्याला ग्रहणी रोग म्हणावे असे सुचविले आहे. ‘ग्रहणीदोषं समवर्जं प्रचक्ष्महे’
अग्निमांद्य व ग्रहणी रोगाचे अधिष्टान हे ग्रहणी अवयव असते. ग्रहणी रोगात अग्निच्या विकृति बरोबर ग्रहणी या अवयवाची व मुहुर्बद्व मुहुर्द्रवं हे लक्षण प्रधान असते तर अग्निमांद्यात केवळ अग्निचीच विकृति असते आणि अष्टांग हर्र्दय चा टीकाकार अरूणदत्त म्हणतो ‘ये तु विषमाद्यास्त्रियस्ते ग्रहणीरोगाभासा इति बोध्यम’| हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.
चिकित्सा लंघन – अग्नि मंद झाल्याने भूक व तहानच लागत व उपवास करावे लंघनाने इंद्रियांची निर्मलता, मलमूत्र विसर्जन शुध्द ढेकर येणे भूकतहान लागने आदि लक्षणे दिसून येतात व त्या नंतर त्या मंद अग्निला संधुक्षित करण्यासाठी लघु मंड पेया विलेपी ह्या आहार द्यावा,
कफाज साम अवस्था हर्ल्हास लालास्राव प्रसेक छर्दि ह्या सारखी उत्कलेश असणारी लक्षणे असतांना वमन द्यावे दोष हे आसाशयात असतात म्हणून वातज अग्निमांद्यात सौम्य वमन देवून कोष्ठ शुथ्दि करावी. निरामा अवस्था आल्यानंतर तिक्त कटु अम्ल द्रव्यांनी सिध्दघूत द्यावे
दुर्बल अग्नि प्रदीप्त करण्यामध्ये स्नेह हे उत्तम द्रव्य आहे.
मात्रापूर्वंक घृत सेवनाने वायु प्रसन्न होऊन त्यास अनुलोमन गती प्राप्त होते हा वायु अग्निसमीपस्थ असल्याने त्याने जाठाराग्निचे प्रदीपन होते.
अतिस्नेहपाने जर जाठराग्नि मंद झाला असेल तर पंचमुलादि चूर्ण, भूनिम्बादिचूर्ण हिंगाष्टकचूर्ण. भास्कार लवण, समशकरा चूर्ण. पंचकोलास प्पिल्यासव ह्यांचा उपयोग करावा. षा व्यतिरिक्त औषध कल्पांचा विवेचन ग्रहणी विकारात आहे.

 

| विषम पचनामूळे धातु वैषम्य तर तीक्ष्णग्निने धातु शोष ||